काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड.अनंतराव देवसरकर यांचं निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उमरखेड येथील काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर यांचं गुरुवारी सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथे अल्पशा आजारानं उपचारदरम्यान निधन झालं.

दोन वेळा ते आमदार होते. तर साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्थांचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविलं होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मूळगावी चातारी (ता. उमरखेड) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे मुलगा जिल्हा परिषद बांधकाम सभापती, राम देवसरकर, परभणी येथील डाॅ. भरत देवसरकर, ३ मुली असा परिवार आहे.

You might also like