IIT च्या माजी विद्यार्थ्यानं बनवला ’मोक्ष’, आता ‘कोरोना’ आणि दिल्लीच्या प्रदूषणातून मिळेल दिलासा, जाणून घ्या किती आहे किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिवाळीनंतर देशाची राजधानी दिल्लीत प्रदूषणाची लेव्हल सतत वाढत आहे आणि कोरोनाचा कहरसुद्धा कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. हेच लक्षात घेऊन आयआयटीच्या माजी विद्यार्थ्याने एक मास्क बनवला आहे. या मास्कचे नाव मोक्ष ठेवले आहे. हा मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात आला आहे. यामध्ये दोन फॅन लावण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही प्यूरिफाइड एअर इन्हेल करू शकता. या मास्कची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात…

ट्विट करून दिली माहिती

MyGovHindi ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, आयआयटी खरगपूरच्या पीयूष अग्रवालने बॅटरीवर चालणारा फॅनवाला मास्क बनवला आहे. पाहुयात या मास्कमुळे प्रदूषण आणि महामारीला तोंड देण्यासाठी कशी मदत मिळेल.

सुमारे 8 तास चालेल बॅटरी

या मास्कमध्ये इन आणि आउट फॅन लावला आहे, जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतो आणि याची बॅटरी जवळपास 8 तास काम करते. पीक्यूआर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडला कवच मास्क बजेटच्या अंतर्गत सरकारकडून पैसेसुद्धा मिळाले आहेत.

किती आहे मास्कची किंमत?

या मास्कची किंमत सुमारे 3 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. याचे नाव मोक्ष ठेवण्यात आले असून, मास्क मेडिकल कर्मचार्‍यांसह सामान्य लोकांसाठीसुद्धा बनवण्यात आला आहे.

लोकांना मिळत आहे रोजगार

हे मास्क तयार करणार्‍या कारागिरांना कोरोना संकटात रोजगार मिळाला आहे. शिवाय ते नवीन टेक्नॉलॉजीसह खूप कही शिकतसुद्धा आहेत.

पीयूष अग्रवालने दिली माहिती

पीयूष अग्रवालने चर्चेत सांगितले की, या मास्कचा कन्सेप्ट आणि डिझाइन पूर्णपणे भारतातच बनवण्यात आली आहे. हा कोरोनापासूनसुद्धा वाचवत आहे आणि दिल्लीच्या प्रदूषणापासूनसुद्धा सुरिक्षत ठेवत आहे.

ऑलिंपिकमध्ये भाग घेणारे अ‍ॅथलिटसुद्धा वापरत आहेत.

यासोबतच पुढील वर्षीच्या ऑलिंपिकची तयारी करत असलेले अ‍ॅथलेटिकसुद्धा हा मास्क घालून तयारी करत आहेत. या मास्कद्वारे सतत प्रॅक्टिस सुरू ठेवत आहेत. यासोबतच कोरोनापासूनसुद्धा बचाव होत आहे.