‘महाराष्ट्रातील 1300 शाळा बंद केल्यात, आमच्या शाळा पाहा’, केजरीवालांचा विनोद तावडेंना टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आप आणि काँग्रेसने जोरदार प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपनंही सभा आणि रॅलींचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रातील नेतेसुद्धा दिल्लीच्या प्रचारात उतरले आहेत. महाराष्ट्रातल्या भाजप सरकारमध्ये माजी शिक्षणमंत्री राहिलेल्या विनोद तावडेंना देखील भाजपने प्रचारात उतरवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ज्यांनी महाराष्ट्रातल्या 1300 सरकारी शाळा बंद केल्या आहेत. ते आता दिल्लीत भाजपचा प्रचार करत आहेत, असे म्हणत विनोद तावडेंवर टीका केली आहे. त्याउलट आम्ही भरपूर मेहनत करून सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपली शाळा दाखवणं, छोले भटुरे खाण्यास देणे आणि दिल्ली दर्शन करवलं पाहिजे, ते अतिथी आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

केजरीवाल यांनी या ट्विट आधी एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी दिल्लीत 200 खासदार, 70 मंत्री आणि 11 मुख्यमंत्री येत आहेत. दिल्लीकरांनी पाच वर्षात खूप मेहनत घेतली केली आहे. त्यांच्या मेहनीचा अपमान करू नका. अतिथी देवो भव, तुमच्यासाठी दिल्ली दर्शनाची तयारी केली आहे. अक्षरधाम, लोटस मंदिराला भेट द्या, परत माघारी फिरा, असे केजरीवाल यांनी म्हटले होते.

फेसबुक पेज लाईक करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like