शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अनिल राठोड यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राण ज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि मुलगा असा राठोड परिवार आहे.
अनिल राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून गेले 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी युतीच्या काळात मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता. त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. त्यांच्यावर आज सकाळी 10 वाजता अमरधाममध्ये अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. अनिल राठोड यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नगर शिवसेनेच्यावतीने शोक व्यक्त करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like