वेस्ट इंडिजच्या माजी जलदगती गोलंदाजाचा अपघाती मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सायकलवरून जात असताना करणे दिलेल्या धडकेत वेस्ट इंडिजचे माजी जलदगती गोलंदाज इझ्रा मोसली यांचे निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. १९९०च्या सुरुवातीला दोन कसोटी व ९ वन डे सामन्यांमध्ये मोसली यांनी वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केलं.

मोसली यांच्या निधनाची बातमी समजताच वेस्ट इंडिजचे क्रिकेट डायरेक्टर जिमी एडम यांनी मोसली यांच्या निधनाची बातमी धक्का देणारी आहे. बार्बाडोसमधून ही दुःखद बातमी आली आहे असे म्हंटले. १९८१ मध्ये विंडीजच्या शेल शिल्ड या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत मोसली यांनी १८ बळी घेतले होते. २४ व्या वर्षी त्यांना दुखापत झाली, परंतु त्यातूनही त्यानी कमबॅक केलं होत. १९८३च्या दक्षिण आफ्रिकेचा दौरा झाला त्यावेळी त्यांनी बंडखोरी केली. त्यावेळी बंडखोरी करणारे ते एकमेव खेळाडू होते. त्यांनतर त्यांच्यावर आजीवन बंदी घातली गेली. मात्र त्यांनी त्यानंतर बार्बाडोसमध्ये स्थानिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली.

१९९०मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांना संघात स्थान मिळाले. इंग्लडविरुद्धच्या सामन्यात मोस्लि यांनी इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार ग्रॅहम गूच यांना दुखापतग्रस्त केलं होतं. त्यामुळे गूच यांना रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. विंडीजनं ती मालिका २-१ अशी जिंकली होती. २०१६ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजच्या महिला संघाचे मोसाली हे सहाय्यक प्रशिक्षक होते.