साडे चार किलो गांजा जप्त 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

विक्रीसाठी आणलेला 64 हजार रूपये किंमतीचा चार किलो 365 ग्राम वजानाचा गांजा वाकड पोलिसांनी बुधवारी काळाखडक येथून जप्त केला आहे.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5a11440-9602-11e8-bc54-2be15e1933a1′]

चंदू प्यारप्पा  पुजारी (60, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) याला अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरीष माने, रमेश गायकवाड, बिभीषन कन्हेरकर, शाम बाबा आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. काळाखडकयेथे एकजण गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी कारवाई  केली असता पुजारी यांच्याकडे  मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा आढळून आला. तपास पोलिस करत आहेत.