नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, ४ भाविकांचा मृत्यू

विदीशा : वृत्तसंस्था – नाशिकहून चारधामच्या यात्रेसाठी जाणाऱ्या खासगी बसला मध्यप्रदेशातील विदीशा जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला. या घटनेत ४ भाविकांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी आहेत. बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते.

या घटनेत ठार झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहिर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.त्यासोबतच जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नाशिकहून सर्वज्ञ यात्रा कंपनीची बस चारधामच्या ५० यात्रेकरुंना घेऊन यात्रेला निघाली. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही बस उज्जैनहून चित्रकुटला जात होती. त्यावेळी बसचालकाचे विदीशा- सागर रोडवर एका वळणावर सुटल्याने बसला अपघात झाला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला.

तर अनेकजण जखमी झाले. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर जखमींवर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. त्यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Loading...
You might also like