बनावट डेबिट कार्डद्वारे सव्वा चार लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट डेबिट कार्ड तयार करून चिंचवड आणि नवी दिल्ली येथून व्यवहार करुन एकाने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या तिघांच्या बँक खात्यावरून ४ लाख २० हजार रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार २९ सप्टेंबर २०१८ ते १ जुलै २०१९ या कालावधीत घडला.

याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया चिंचवड शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रमोद नामदेवराव ढेंगरे (५३, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया चिंचवड शाखेमधील दिलीप मारुती डोळ, अश्विन अमोलक दुगड आणि सुभाष ज्ञानोबा पडवळ यांच्या खाते क्रमांकाचे नकली डेबिट कार्ड तयार केले. त्याद्वारे दिलीप डोळ आणि अश्विन दुगड यांच्या खात्यावरून प्रत्येकी १ लाख ६० रुपयांचा व्यवहार केला.

सुभाष पडवळ यांच्या खात्यावरून १ लाखांचा असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा व्यवहार केला. हा प्रकार लक्षात येताच मुख्य व्यवस्थापक ढेंगरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !