‘धन्नो’ घेऊन 7 दिवसात मुंबईहून जौनपुरला पोहचले 4 युवक, ‘बॉर्डर’वर पकडले गेले

वाराणसी : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे इतर शहरांमध्ये अडकलेले लोक घरी पोहचण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. कोणी दुचाकीवरून घरी परतत आहे तर कोणी शेकडो किमी चालत घरी जात आहेत. रविवारी सायंकाळी चारजण मुंबईहून ‘धन्नो’वरून जैनपूरला आले. या चौघांना मुंगराबाद शहापूर सीमेवर पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाई केले. पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाइन केलेले हे चौघेजण आंबेडकर नगरमधील रहीवासी आहेत.

हरिपाल यादव, श्याम कुमार, बुधीराम आणि उमेश कन्नौजिया (रा. अंधेरी पूर्व, मुंबई मुळ रा. आंबेडकरनगर) अशी ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांचा ऑटो रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. लॉकडाऊन होण्यापूर्वी त्यांचे सर्व काही व्यवस्थित चालले होते. परंतु नंतर त्यांच्या अ‍ॅटोप्रमाणे त्यांच्या जिवनाचेही चाक थांबले. यानंतर त्यांनी आपल्या घराकडे परतण्याचा निर्णय घेतला. परंतु बसगाड्या बंद पडल्याने हरिपाल याच्या टेम्पो तेल भरले आणि त्यांनी आळीपाळीने गाडी चवलत सात दिवसांनी रविवारी जैनपुरला पोहचले.

जानघाईजवळील सीमेवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यानंतर मुंगराबाद शहापूर आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी चौघांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांची प्रकृती सामान्य असल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना पोलिसांनी चौघांना दिल्या आहेत.