‘विकॅनो सुपर 300’ मुळे होणार चारपट उर्जेची बचत ‘मेक इन इंडिया’अंतर्गत पुण्यातील विकर्ष नॅनो टेक्नॉलॉजीकडून नवतंत्रज्ञान विकसित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इलेक्ट्रिक व्हेईकल व पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी उपयुक्त आणि अतिसूक्ष्म जाडी असलेल्या ‘वीकॅनो सूपर 300’ (25 मायक्रोन) या नॅनो क्रीस्टलाईन रिबनचे संशोधन व निर्मिती करण्यात पुण्यातील विकर्ष नॅनो टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड अलॉईजला यश आले आहे. या अत्यंत आधुनिक अशा नॅनो क्रीस्टलाईन अलॉय रिबनच्या चूंबकीय व इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी निगडीत विशिष्ट गुणधर्माने या क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. विकॅनो सुपर ३०० या मॅग्नेटिक मटेरियलमुळे मोठ्या प्रमाणात उर्जेची, तसेच पैशांची बचत होणार आहे, अशी माहिती विकर्ष नॅनो टेक्नॉलॉजीचे संचालक समीर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विकर्ष नॅनो टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शक रमेश वाणी, संचालक मिलिंद वाणी, राजाराम शिंदे, प्रकल्प प्रमुख अ‍ॅलन डिकोस्टा आदी मान्यवर उपस्थित होते. विकॅनो सुपर 300′ सह ही नॅनो क्रीस्टलाईन उत्पादनाचे 18 ते 22 जानेवारीस होणार्‍या ‘इलेकरामा’ ह्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रानिक्सच्या भारतातील सर्वात मोठ्य ‘प्रदर्शनात अनावरण करण्यात येणार आहे.

समीर शिंदे म्हणाले, ‘2016 पासून इलेक्ट्रिक व्हेईकल व पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे युग भारतात व जगभर ठळकपणे दिसू लागले आहे. 2030 पर्यंत 1070 ट्रीलीयन व्हॅट अवर्स इतक्या क्षमतेच्या इलेक्ट्रिक व्हेइकल जगभरात रस्त्यावर असतील, असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उर्जेची गरज भासणार आहे. त्यातून ग्लोबल वार्मिंग व ग्रीन हाऊस गॅसचीही वाढ होईल. हे प्रचंड इलेक्ट्रिक कन्झम्शन कमी करण्यासाठी अशा आधुनिक मॅग्नेटीक मटेरीयलची गरज निर्माण झाली होती. भविष्याची गरज ओळखुन ‘विकर्ष’च्या संशोधन व विकास विभागाने हाय फ्रिक्वेन्सीवर उपयुक्त अशा (विकॅनो सुपर 300) नॅनो क्रिस्टलाईन अलॉय व नॅनोक्रिस्टलाईन रिबनवर संशोधन केले. ही नॅनो क्रीस्टलाईन रिबन हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल (20 किलो हर्टस आणि अधिक) मध्ये सध्याच्या उत्पादनापेक्षा चारपट सुपिरीअर आहे. त्यामुळे यापासून बनवलेली उत्पादने चारपट विजेचा वापर कमी करणार आहेत. त्यामुळे वीजेची बचत तर होतेच; पण उत्पादनांचा आकारही छोटा होतो. सद्यस्थितीत कंपनीची उत्पादन क्षमता 150 मेट्रीक टन प्रती वर्ष इतकी आहे. या 150 मेट्रीक टन उत्पादनातून प्रती वर्षी विजेची चोवीस लाख वॅट एवढी बचत होणार आहे. दरवर्षी 24 लाख वॅट बचत वाढणार आहे. ग्रीन हाऊस गॅसेस वाचून ग्लोबल वार्मिंग व निसर्ग संर्वधनाला हातभार लागणार आहे. या उत्पादनाला रेस्ट्रिक्शन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस डायरेक्टिव्ह (आरओएचएस) मानांकनही मिळाले आहे. याशिवाय, उत्पादनामुळे दरवर्षी साधारण दोन मिलीयन डॉलर इतके परकीय चलन वाचणार आहे. या उत्पादनास विदेशातूनही मागणी सुरू झाली आहे.’

रमेश वाणी म्हणाले, ‘चार ते पाच वर्ष सलग संशोधनाचे काम सुरु होते. याच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या देशातून सामग्रीने आणून प्रयोग केले गेले. ही निर्मिती यशस्वी होणे ही भारतातसाठी अभिमानाची गोष्ट आहे.’

मिलिंद वाणी म्हणाले, ‘या रिबीनला भारतात तसेच भरताबाहेर खूप मागणी आहे. या निर्मितीमुळे भारताला प्रगत दिशेने घेऊन जाण्याचे स्वप्न साकार होईल.’ ऍलन डिकॉस्टा म्हणाले, ‘सुरवातीच्या टप्प्यात बेसील मटेरियल वापरून काम सुरु केले. अनेक समस्या येत होत्या त्यातून संशोधन करत मार्ग काढले. या उत्पादनामुळे पॉवर, इलेक्टॉन्स, डिफेन्स क्षेत्राला याचा खूप फायदा होईल.’

संशोधनात यांचा सहभाग-
या संशोधन प्रकल्पात समीर शिंदे व मिलींद वाणी, अ‍ॅलन डीकोस्टा व अभय पाटील व कंपनीतील सर्व कर्मचार्‍यांचा सहभाग आहे. चार वर्षांच्या अथक प्रयत्नातून ऑगस्ट 2019 मध्ये पहिले यशस्वी उत्पादन घेण्यात आले. शंभरच्यावर अयशस्वी प्रयोगानंतर या गुंतागुंतीच्या टेक्नॉलॉलीमध्ये ’विकर्ष’ने निपुणता मिळवली. या संशोधनासाठी चार वर्षांच्या कालावधीत सुमारे दहा कोटी रूपयांपेक्षा जास्तीची गुंतवणूक करण्यात आली. कंपनीचे आधारस्तंभ रमेश वाणी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलायातील मेटलर्जी विभागाचे प्रमुख डॉ. एन. बी. ढोके यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. 2017 मध्ये ’विकर्ष ग्रुप’च्या अशाच नाविन्यपूर्ण उत्पादनास तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पंधरा लाख रूपये व सन्मानचिन्ह देऊन ‘टेक्नॉलॉजी डे अ‍ॅवॉर्ड’ने गौरवण्यात आले होते.

‘विकर्ष नॅनो’चा प्रवास-
2009 ते 2013 काळात नॅनो क्रिस्टलाईन रिबनवर संशोधन
2013 मध्ये विकर्ष नॅनो टेक्नॉलॉजीची स्थापना
2014-15 मध्ये सर्व चाचण्या, आरओएचएस मानांकन, पीजीसीआयएल मान्यता
2017 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरव
ऑगस्ट 2019 मध्ये ’विकॅनो सुपर 300’ची निर्मिती
सप्टेंबर 2019 मध्ये नॅनो क्रिस्टालाईन ग्रेडला आरओएचएस प्रमाणपत्र
ऑक्टोबर 2019 मध्ये ’विकॅनो सुपर 300’चे उत्पादन सुरु
जानेवारी 2020 मध्ये ’विकॅनो सुपर 300’ग्रेडचे इलेकरामा प्रदर्शनात अनावरण

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/