एकाच रात्री अज्ञात चोरटय़ांनी चार घरे फोडून लाखो रुपयांचे ऐवज घेऊन चोरटे फरार

नायगाव : पोलीसनामा ऑनलाइन – रामतीर्थ पोलीस ठाण्या अंतर्गत येणार्‍या  जिगळा नंबर दोन येथील  एक घर व रामतिर्थ येथे तिन घरे अशी एकाच रात्री चार घरे फोडून सोने साडेचार तोळे चांदी पंचेचाळी तोळे एक मोटरसायकल व रोक रक्कम तेतीस हजार पाचशे रुपये  मिळुन जवळ पास एक लाख सत्यनव हजार सहाशे  रुपयांची चोरी करुन चोरटे धुमाकूळ घालून फरार झाले.

हि घाटन दि.१० डिसेंबर रोजी मध्यरात्री च्या सुमारास घडली असुन या घटनेची माहिती रामतिर्थ पोलिसांना समजताच घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.असता पोलिस उपविभागीय अधिकारी नुरहसन यांनी घटनास्थळी भेट देऊन पााहणी केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बिलोली तालुक्यातील जिगळा नंबर दोन येथील बाबाराव रामजी पिसाळे हे आपल्या वाड्याचे दार आतून लावून झोपले असता सोमवारच्या मध्यरात्री चोरटे घराचे दोन गेटचे कुलुप तोडून घरात शिरून बाजुच्या रुम मध्ये झोपलेल्या घरातील सदस्यांना बाहेरून कडी लावून दुसर्‍या खोलीत असलेले कपाटातील पंधरा हजार रोख रक्कम व मडक्याच्या उतरंडी मधील सोन्याची दागिने साडेतिन तोळे सोने व पंधरा तोळे चांदी घेतले व आंगणात असलेली मोटरसायकल  क्र एम.एच.२६ ए.झेड.४५९८ अंदाजे तिस हजार रुपयांची हे  घेऊन पसार झाले.

तर रामतिर्थ येथील बाजीराव मारोती रोकडे यांच्या घरातील बॅगमध्ये असलेले सहा ग्रामचे सोन्याचे नेकलेस व सत्तावीस तोळ्याचे चांदीचे दागिने घेऊन गेले तर दादाराव कोंडिबा पा.पुय्यड यांच्या घराच्या मागच्या गेटचे कुलुप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी पेटी घेऊन गावातील खारीत फोडून त्यातील नगदी दोन हजार रुपये,  दोन ग्रामची  सोन्याचीअंगठी व दोन तोळे चांदी  घेऊन गेले तर सरस्वती नागोराव रोकडे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चांदीचे  दागिने  दहा तोळे सोने पाच ग्राम रोक रक्कम सोळा हजार घेऊन अज्ञात चोरटे  फरार झाले.

जिगळा येथील बाबाराव रामजी पिसाळे यांनी सकाळी नेहमी प्रमाणे  उठुन  घरांचे दरवाजे उघडले असता बाहेरून दार लावल्याचे समजले व शेजारच्या  व्यक्तीला फोन लावून बोलवले असता  त्यांनी दरवाजा उघडुन बाहेर येवुन आतील ऐवजाची पाहणी केली असता वरील उल्लेखलेला ऐवज गेल्याचे लक्षात आले.

या घटनेची माहिती रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक जाधव  यांना समजताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठांना माहिती दिली यावेळी जिगळा व रामतिर्थ येथे झालेल्या चोरीचा शोध लावण्यासाठी नांदेड येथील रॅबो डाॅग  युनिट या श्वान पथकाचे  पिआय कुलकर्णी, एपिआय धुरवे, मदानी, नागरगोजे  व फिंगरप्रिंटची पथक व पोलिस उपविभागीय अधिकारी नुरल हसन यांनी  घटनास्थळी भेट दिली.

घर मालक बाबाराव रामजी पिसाळे  यांच्या फिर्यादी वरून रामतिर्थ पोलीसात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते. अधिक तपास (सपोनि) अशोक जाधव  करीत आहेत.