Pune : दिवाळी अन् त्यानंतर आत्तापर्यंत श्वसनाच्या आजारांचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले, छातीविकारतज्ज्ञांचे निरीक्षक

पोलीसनामा ऑनलाईनः – दिवाळीनंतर दरवर्षी श्वसनाच्या विकाराच्या (Respiratory disorders) रुग्णांच्या संख्येत वाढ होते. यंदाही ती वाढली असून आतापर्यंत पुण्यात श्वसनाच्या आजाराचे प्रमाण 40 टक्यांनी (An increase of 40 per cent) वाढल्याचे निरीक्षण पुण्यातील छातीविकार तज्ञ्ज्ञांनी नोंदवले आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा आतषबाजीचे प्रमाण कमी दिसले तरीही हवेतील बदलामुळे फटाक्याच्या प्रदुषणाचे परिणाम रुग्णावर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरवर्षी दिवाळीच्या दिवसात फटाक्याच्या आतषबाजीमुळे हवेत सल्फर- डायऑक्साईड, कार्बन-़डायऑक्साईड आणि मोनो ऑक्साईड मोठ्या प्रमाणात फसरतात. त्यामुळे श्वसनसंस्था आणि मेंदूवर परिणाम होतो.विशेषतः लहान मुले, आजारी व्यक्ती, महुमेही रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास होतो. दिवाळीनंतर काही दिवसात श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 40 टक्के वाढले आहे. अशी माहिती कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अरुण सुराडकर यांनी दिली तर डॉ. महेश लाखे म्हणाले की, श्वास घेण्यात अडचण, नाक वाहणे, घसा खवखवणे, छात्रदायक दमा, छातीत संक्रमण अशा सामान्य तक्रारी समोर येत आहेत. प्रदुषणामुळे विषाणुजन्य आणि बॅक्टेरीयाचा न्युमोनिया होण्याची शक्यता वाढते.

प्रदूषणाचे दुष्परिणामः
1) दमा तसेच अ‍ॅलर्जी वाढणे
2) डोळांची जळजळ,
3) डोकेदुखी
4) धाप लागणे
5) झोप येणे, मळमळ उलट्या