FB वर कर्ज देण्याची जाहिरात प्रसारित करून फसवणूक करणारा अटकेत

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट फेसबुक पेज तयार करून त्यावर कर्ज देण्याची जाहिरात प्रसारित करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पिंपरी-चिंचवड सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. बिरजू दिनकर पाटील (रा. चव्हाणनगर, चंदननगर, पुणे) याला अटक केली आहे. आरोपीने फेसबुकवर कृष्णाजी अग्रवाल नावाने बनावट पेज तयार करून साहिल पंढरीनाथ पारधी यांची आर्थिक फसवणूक केली.

साहिल पारधी यांना व्यावसायामध्ये तोटा आल्याने त्यांना कर्जाची आवश्यकता होती. दरम्यान फेसबुकवर कृष्णाजी अग्रवाल या नावाने असलेल्या पेजवर जिओ फायनान्सची जाहिरात साहिल यांनी पाहिली. त्यावर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून कर्जाची मागणी केली. त्यावेळी आरोपीने जिओ फायनान्स कडून ८ लाख रुपये कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. कर्ज मंजूर करुन देण्यासाठी त्याने १ लाख ३ हजार रुपये कमीशनची मागणी केली. साहिल यांनी त्याला होकार देऊन आपले पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे कोरे चेकची माहिती दिली. आरोपीने साहिल यांच्याकडे वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी पंजाब नॅशनल बँकेत पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ३९ हजार रुपये खात्यावर भरले. पैसे देऊनही कर्ज न मिळाल्याने साहिल पारधी यांनी सायबर सेलकडे तक्रार केली.

सायबर सेलने केलेल्या तपासात पंजाब नॅशनल बँकेतील खाते संदेश जवाहर जैन यांच्या नावावर असून त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले. तांत्रीक तपासामध्ये हे खाते आरोपी बिरजू पाटील हा वापरत असून त्यानेच फेसबुकवर बनावट पेज तयार करून साहिल यांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी बिरजू पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, साहयक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे, स्वाती लामखडे, पोलीस कर्मचारी अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिचेवार, पोपट, हुलगे, कृष्णा गवळी, नाजुका हुलावळे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या