मोफत गॅस सिलेंडर मिळवण्याची शेवटची संधी ! PM Ujjwala Yojana व्दारे मिळतंय Free Cylinder, ‘या’ पध्दतीनं घ्या फायदा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजने अंतर्गत गरीब ग्रामीण महिलांना मोफत गॅस सिलेंडर दिला जातो. या योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर नंतर आता मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाही. कोरोनामुळे सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत 7.4 कोटी महिलांना आणखी तीन सिलेंडर देण्याची घोषणा केली होती. एप्रिल मध्ये सुरु करण्यात आलेली ही स्कीम सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आली होती. या तर जाणून घेऊ या योजनेचा लाभ कसा घेता येईल.
सप्टेंबर नंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही :
या योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याच्या नंतर योजनेंतर्गत देण्यात येणारा गॅस सिलेंडर मोफत मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शेवटची संधी आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं लागेल. तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
उज्ज्वला योजनेत असं करा रजिस्ट्रेशन
या योजनेत रजिस्ट्रेशन करणं खूप सोपं आहे. उज्जला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेण्यासाठी BPL कुटुंबातील कोणतीही महिला अप्लाय करू शकते. Pmujjwalayojana.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक फॉर्म भरून जवळच्या LPG वितरण केंद्रावर जमा करावा लागेल.
अप्लाय करण्यासाठी द्यावी लागते ही माहिती
या फॉर्म मध्ये महिलेला तिचा पूर्ण पत्ता, जनधन बँक अकाउंट आणि कुटुंबातील सदस्यांचा आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर देशातील ऑयल मार्केटिंग कंपन्या योग्य लाभार्थींना LPG कनेक्शन सुरु करतात. जर लाभार्थीने EMI चा ऑप्शन निवडला तर EMI चे पैसे सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडी मध्ये ऍडजस्ट केले जातात.
कोण घेऊ शकतं या योजनेचा फायदा
या योजनेचा फायदा BPL कार्ड धारकांनाच घेता येतो. महिला स्वतःच्या नावावर गॅस कनेक्शन घेऊ शकते. सबसिडी मिळवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय सेव्हिंग बँकेत अकाऊंट असणं गरजेचं आहे.
योजना सूरू करण्याचा हा होता हेतू
ही योजना गरीब महिलांसाठी आहे. ग्रामीण भागातील महिलांना मोफत एलपीजी गॅस सिलेंडर दिला जातो. ग्रामीण भागातील महिलांचे चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली.