Free Screening Of The Kerala Story In Kothrud Pune | कोथरूडमधील महिला व तरुणींना ‘द केरल स्टोरी’चे मोफत स्क्रिनिंग; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Free Screening Of The Kerala Story In Kothrud Pune | सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी (The Kerala Story) चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय समजून घ्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विशेष उपक्रम घेतला आहे. नामदार पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमधील दहा हजार पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त महिलांनी हा सिनेमा पाहिला आहे.

समाजातील ज्वलंत विषय मांडण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. द केरल स्टोरीज हा असाच समाजातील ज्वलंत विषय मांडणारा सिनेमा असून, सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला आहे. हजारो तरुणी आणि तरुणी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. (Free Screening Of The Kerala Story In Kothrud Pune)

कोथरूड मतदारसंघातील सर्व महिलांना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला असून, हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत आहे.
जवळपास दहा हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहावा यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
गेल्या आठ दिवसांत पाच हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहिला आहे.

Web Title :- Free Screening Of The Kerala Story In Kothrud Pune | Free screening of ‘The Kerala Story’ to women and youth in Kothrud; An initiative of Guardian Minister Chandrakant Patil
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update