आजपासून स्वस्त झाली कार खरेदी, हॉटेलमध्ये राहणं देखील झालं स्वस्त, जाणून घ्या पूर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. तर काही गोष्टी महाग देखील झाल्या आहेत. त्यामुळे आजपासून हॉटेलमध्ये राहण्यापासून ते चारचाकी गाडी विकत घेण्यापर्यंत अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आजपासून तुमच्या खिशावर किती बोजा पडणार आहे किती गोष्टी स्वस्त होणार याची आपण माहिती घेणार आहोत.

या गोष्टी होणार स्वस्त

1)हॉटेलमध्ये राहणे स्वस्त
जीएसटी काउंसिलच्या बैठकीत सर्वात मोठा दिलासा हॉटेल इंडस्ट्रीला देण्यात आला आहे. त्यामुळे आता १००० रुपयांपर्यंत भाडे असलेल्या रूमला टॅक्स द्यावा लागणार नाही. तर साडेसात हजार रुपये भाडे असलेल्या रूमला आता 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.

2)गाड्या स्वस्त
जीएसटी काउंसिलच्या बैठकीत 28 टक्क्यांवर टॅक्स असलेल्या 10 ते 13 सीट असलेल्या वाहनांवरील सेस कमी करण्यात आला आहे. तर 1200 सीसी वाहनांवरील सेस 1 टक्क्यांनी कमी केला आहे.

3)मारुती सुझुकीच्या या गाड्या स्वस्त
मारुती सुझुकीने आपल्या अनेक गाड्यांच्या किमतींमध्ये कपात केली असून ऑल्टो 800, ऑल्टो के10, स्विफ्ट डिझेल, सिलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिजायर डिझेल , टूर एस डिझेल , विटारा ब्रेजा आणि एस-क्रॉस या गाड्यांचा समावेश आहे. मात्र काही मॉडेल्सच्या किमतींमध्ये कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ होऊन अर्थव्यवस्था सांभाळण्यास वाढ होणार असल्याचा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या सगळ्या गोष्टींबरोबरच  समुद्री जहाजांच्या इंधनांच्या किमती, ग्राइंडर, हिरे, रुबी, पन्ना आणि नीलम हे रत्न सोडल्यास इतर रत्नांवरील टॅक्समध्ये कपात करण्यात आली आहे.

या वस्तू झाल्या महाग

 1)ट्रेनचे डब्बे झाले महाग
रेल्वेचे प्रवासी डब्बे आणि मालवाहतुकीच्या डब्ब्यांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आले आहे.

2)पेय पदार्थ महाग
यावरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्के केल्याने या वस्तूंवरील दरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

Visit : Policenama.com