Fruits To Avoid For Weight Loss | जर तुम्ही खात असताल ‘ही’ फळे तर वजन कमी होण्याऐवजी वाढेल ! जाणून घ्या कोणती फळे वाढवतात कॅलरीज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fruits To Avoid For Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेच लोक डाएट फॉलो करतात. डायटमध्ये आपण पुरेसे पोषण शरीराला मिळेल अश्या पदार्थांचा समावेश करतो. आणि या मध्ये फळांचा मोलाचा वाटा आहे. फळे व्हिटॅमिन, मिनरल आणि बीटा कॅरोटीन सारख्या अश्या अनेक पोषांनानी सज्ज असतात तसेच बहुतेक फळांमधून फायबरचे प्रमाण देखील चांगले मिळते, जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून बहुतांश लोक फळांचा समावेश डाएट मधे आवर्जून करतात. (Fruits To Avoid For Weight Loss).

 

पण तुम्हाला माहीत आहे का असे काही फळ आहेत जे तुमचा वजन कमी करण्याऐवजी वजन वाढवत आहेत (Mistakes In Weight Loss). वास्तविक, काही फळे अशी आहेत ज्यामध्ये साखर, फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. चला अशाच काही फळांबद्दल जाणून घेऊया.

 

वजन कमी करण्यासाठी ही फळे खाणे टाळा (stop consuming this fruits for weight loss) :-

 

केळी (Banana)
केळी हे डाईजेस्तीबल (पचण्याजोगे, digestible) आणि पोटॅशियम युक्त फळ आहे. जे आपल्या मज्जासंस्थेसाठी (For the nervous system) खूप चांगले आहे पण त्यामुळे वजनही वाढते. कारण केळीमध्ये साखर असते. सामान्य आकाराच्या केळीमध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त सेवन केले तर केळी वजन कमी करण्याऐवजी वाढवण्याचे काम करते. (Fruits To Avoid For Weight Loss)

 

अननस (Pineapple)
अननस हे आरोग्यदायी फळ आहे, पण वजन कमी करण्यासाठी त्याचे सेवन केल्यास विपरीत परिणाम होऊ शकतो. अननसाचे नियमित सेवन केल्याने आपले वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. कारण अननसात भरपूर साखर असते. यामुळे आपल्याला भरपूर कॅलरीजही (50 calories / 100 gm) मिळतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर अजिबात करू नये.

एवोकॅडो (Avocado)
एवोकॅडोला मगर नाशपाती म्हणून पण ओळखले जाते. एवोकॅडो, पचन व्यतिरिक्त, हाडे, डोळे आणि मेंदूसाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण यात भरपूर कॅलरीज असतात (190 calories/100 gm एवोकॅडो). म्हणुन हे एक चांगले एनर्जी बूस्टर देखील आहे. यावरून हे स्पष्ट होते की एवोकॅडोचे नियमित सेवन केल्याने आपले वजन कमी होण्याऐवजी वाढते.

 

द्राक्षे (Grapes)
द्राक्ष अत्यंत लोकप्रिय फळं आहे. 100 ग्रॅम द्राक्षांमध्ये 16 ग्रॅम साखर आढळते. यामुळे आपल्याला सुमारे 65 कॅलरीजची ऊर्जा मिळते.
त्यामुळे हे स्पष्ट आहे की वजन कमी करण्यासाठी द्राक्षांचा वापर करू नये.

 

आंबा (Mango)
आंबा हा फळांचा राजा मानला जातो आणि तो सर्वांना आवडतो. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सोबत पोटॅशियम देखील चांगल्या प्रमाणात आढळते,
परंतु वजन कमी करण्याच्या दृष्टीने त्याचे सेवन चांगले नाही. कारण त्यात कॅलरीजही चांगल्या प्रमाणात असतात.
शंभर ग्रॅम आंब्यापासून आपल्याला सुमारे साठ कॅलरीज मिळतात (60 calories/100 gm mango). त्यामुळे वजन कमी करत असताल तर आंबा खाणे टाळा.

 

नाशपती (Pear)
एका मध्यम आकाराच्या पिअर (pear) म्हणजेच नाशपतीमध्ये 17 ग्राम पर्यंत साखर असते.
त्यामुळे वजन कमी करण्यात नाशपती काही मदत करू शकत नाही म्हणून त्याचा डाएटमध्ये समाविष्ट करू नका.

 

Web Title :-  Fruits To Avoid For Weight Loss | fruits-to avoid for weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Period Pain | पीरियडच्या दरम्यान पोट आणि कंबरदुखीचा होत असेल त्रास तर ‘हे’ 5 घरगुती उपाय अवलंबा; जाणून घ्या

 

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6299 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune NCP | राष्ट्रवादीकडून पुण्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; 204 युवक-युवतींना मिळाली रोजगाराची संधी