खळबळजनक ! पोलिस अधिकार्‍याच्या वाहनचालकाची गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन –   गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी (ऑपरेशन) ढोले यांच्या वाहन चालकाने स्वत:वर गोली झाडून घेत आत्महत्या केली. मदन गौरकार (वय-47) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून गौरकर यांनी कर्तव्यावर हजर असताना स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे गडचिरोली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मदन गौरकार हे मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले यांच्या निवासस्थानी ड्युटीवर हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी याठिकाणी सुरक्षेसाठी तैनात गार्डच्या मोर्चामध्ये गेले. त्यावेळी तिथे कुणीही हजर नव्हते. मदन गौरकार यांनी सुरक्षा गार्डची रायफल घेऊन स्वत:वर गोली झाडली.

गौरकार यांनी मानेला रायफल लावली आणि गोळी झाडली. गोळी थेट डोक्यातून आरपार गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षारक्षक जेव्हा तेथे पोहचले त्यावेळी मदन गौरकार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मदन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. मदन गौरकार यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप कळ शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.