Gadchiroli Police News । गडचिरोलीत पोलीस हवालदाराचा धारदार शस्त्राने खून; प्रचंड खळबळ

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – Gadchiroli Police News । गडचिरोली (Gadchiroli) येथे एका पोलीस हवालदाराची (Police constable) हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस हवालदाराचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून (Murder) करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर पोलीस हवालदाराला हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. जगन्नाथ सिडांम (वय, 53) असे त्या हवालदाराचे नाव आहे. (Police constable killed with sharp weapon in Gadchiroli)

अधिक माहिती अशी की, पोलीस हवालदार जगन्नाथ सिडांम (Police constable Jagannath Sidham) हे भामरागड़ तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात कार्यरत होते. तर, जगन्नाथ सिडांम यांच्यावर नागेपली येथे काल राहत्या घरी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चाकुने सपासप वार केले. हल्ल्यानंतर सिडांम यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या दरम्यान, हल्ल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी, विशाल ठाकुर, पोलीस निरीक्षक प्रविण डांगे (Police Inspector Pravin Dange) आणि श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहे.

हे देखील वाचा

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्ण, 249 रुग्णांना डिस्चार्ज

Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षकांना ऑनलाइन क्लास सुरू असताना शिवीगाळ; कोंढवा पोलीस ठाण्यात

Nawab Malik | भाजप नेत्यांकडूनच गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा गंभीर आरोप

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : gadchiroli police news | police constable murdered in gadchiroli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update