नालासोपार्‍यात घरात घुसून केला महिलेवर बलात्कार, 3 नराधम ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नालासोपारा शहरात एका विवाहित महिलेवर घरात घुसून तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांकडून 3 आरोपींना अटक केली आहे.

नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. तिचा पती रिक्षाचालक असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा चालक पती सीएनजी भरण्यासाठी मीरा भाईंदर येथे गेला होते. त्यावेळी महिला एकटीच असल्याची संधी साधून तीन नराधमांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर नराधमांनी आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला. महिलेचा पती आल्यावर त्यालाही मारहाण करून तेथून पळ काढला. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना काल वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास नालासोपारा पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, थेट घरात घुसून अत्याचार करण्यापर्यंत नराधमांची मजल गेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.