देहूरोड बाजारपेठेत टोळक्याचा राडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

हातामध्ये धारदार शस्त्रे, लाठ्या-काट्या घेऊन आलेल्या टोळक्याने देहूरोड बाजारपेठेतील दुकानांची तोडफोड आणि महामार्ग परिसरातील वाहनांची तोडफोड करून राडा केला. हा प्रकार रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d1d11b7-8bc9-11e8-9f7a-91fee39b171e’]

कोयते, हॉकीस्टीक, लोखंडी रॉड आदी घातक शास्त्रे घेऊन तीन दुचाकींवरून आलेल्या सुमारे नऊ जणांनी बाजारपेठेत अक्षरशः धुमाकुळ घातला. मध्य बाजारपेठेतील राहुल प्रिंटर्स, पुजा सोअर्स आणि आणखी एका दुकानात घुसून तोडफोड केली. तेथून टोळके महामार्गावर आले. रस्त्याने जाणाऱ्या डस्टर मोटारीची काच फोडली. मोरया हॉटेलजवळ ऑटो रिक्षा चालकाला मारहाण केली. रिक्षाचीही तोडफोड केली. तेथून जवळच सवाना चौकात पादचारी तरूणांना मारहाण केली.

या प्रकाराची माहिती देहूरोड पोलीसांना कळविण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दारवल झाले आहेत. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात घातक शस्त्रे घेऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. आता तर दुकानात शिरून हल्ले करण्यापर्यंत मजल गेली आहे. या प्रकारांमुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीखाली आहे.