Ganpatrao Deshmukh | जेष्ठ नेते माजी आ. गणपतराव देशमुख यांचे 94 व्या वर्षी निधन; 54 वर्ष आमदार म्हणून केलं होतं मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे प्रदिर्घ आजाराने आज (शुक्रवार) निधन झाले. गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज (शुक्रवार) रात्री नऊच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 94 वर्षांचे होते.

गणपतराव देशमुख हे तब्बल 11 वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे विधनसभा निवडणूक लढवली नव्हती. गणपतराव देशमुख यांनी 54 वर्षे सांगलोल्याचे प्रतिनिधित्व केले. देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) एकमेव आमदार होते. सांगोला (Sangola) हा शेकापचा (Shetkari Kamgar paksh) बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.

कोण आहेत गणपतराव देशमुख ?
गणपराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार होते. 1960 रोजी त्यांनी सांगोल्यातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांना भरभरुन मतांनी विजयी केले. विशेष म्हणजे 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारने त्यांचा गौरव केला होता.

महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी सलग 11 वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा पराक्रम केला आहे. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हा देखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

Web Title :- Ganpatrao Deshmukh | big news ganapatrao deshmukh passes away he took his last breath solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mantralaya Officers Transfer | ठाकरे सरकारचा सरकारी बाबूंना दणका ! तब्बल 103 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Shambhuraj Desai | राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात

Diabetes cure | डायबिटीजच्या रूग्णांसाठी खुशखबर ! बायोकॉनच्या नव्या औषधाला मंजूरी; जाणून घ्या कसा फायदा मिळणार