Lockdown : लग्नाला निघालेला नवरदेव वर्‍हाडी मंडळीसह अटकेत, पोलिसांनी कार देखील केली सीलबंद

गाझियाबाद : वृत्तसंस्था – लॉकडाउनचे उल्लंघन करणे नवरदेव आणि वरातीला महागात पडले असून पोलिसांनी दोन कारमधून गुप्तपणे मेरठला जाणाऱ्या वधूसह सात वरातींना अटक केली आहे. हे सात आरोपी मेरठच्या श्यामनगरमध्ये झालेल्या निकाह कार्यक्रमात जात होते. त्यांच्या ताब्यातून दोन अंगठ्या आणि लग्नाचे कार्ड जप्त केले आहे.

पोलिसांनी दोन्ही कार जप्त केल्या असून आरोपींविरुद्ध लॉकडाऊनचे उल्लंघन करण्याच्या कलम अंतर्गत कारवाई केली आहे. अटक केलेल्या नवरदेवाचा सोमवारी निकाह होता.

कार चालकांनी खोलली पोल
कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन असून या काळात सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावर बंदी आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक ओ.पी.सिंग यांनी सांगितले कि रविवारी रात्री पोलिस रावली रोडवर गस्त घालत होते. यादरम्यान दोन कार येताना दिसल्या. पोलिसांनी दोन्ही गाड्या अडवून त्यांची चौकशी केली. त्यावर कार चालकांनी सांगितले की, ते नूरगंज येथील ताजुद्दीनची वरात घेऊन मेरठ श्यामनगर लिसाडी गेटला जात होते.

पोलिसांनी निकाह परवानगी पत्र मागितल्यावर आरोपींनी समाधानकारक उत्तर दिले नाही. कारमधून दोन अंगठ्या आणि लग्नाचे कार्ड जप्त केले. या प्रकरणात नवरदेव ताजुद्दीन, वराती वकील, कमरुद्दीन, मेहबूब, फैयाज, इकरामुद्दीन, सलमान रहिवासी नूरगंज कॉलनी यांना अटक केली आहे.

रात्री नवरीची होणार होती विदाई
चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की त्यांचा प्रयत्न रात्री मेरठ येथे पोहोचणे आणि सोमवारी सकाळी निकाह कार्यक्रम पार पडल्यानंतर वधूला रात्रीच्या अंधारात आणण्याचा होता. याप्रकरणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ उपनिरीक्षक अरविंद शर्मा यांच्यावतीने आरोपींविरोधात रिपोर्ट दाखल करण्यात आला असून दोन्ही कार जप्त करण्यात आल्या आहेत.

कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू आहे. यादरम्यान सामाजिक, धार्मिक यांच्यासह इतर सर्व कार्यक्रमांवर बंदी आहे. उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे.