हैदराबाद महापालिका निवडणूक 2020 : तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील, पण हैदराबादच नाव बदलणार नाही, ओवेसीचा योगीवर पलटवार

हैदराबाद: पोलीसनामा ऑनलाईन – हैदराबादच नाव बदलून भाग्यनगर करू, असे आश्वासन देणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath ) यांच्यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी ( MIM MP Asaduddin Owaisi) यांनी जोरदार टीका केली. हैदराबादचे नाव बदलणे हेच भाजपच लक्ष्य ( The BJP’s goal is to change the name of Hyderabad) आहे. पण तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील, पण हैदराबादच नाव बदलणार नाही, अशा शब्दात ओवेसीने योगीवर पलटवार केला आहे. ज्यांना शहराचे नाव बदलायचे आहे, त्यांना आता जनतेनच प्रत्युत्तर द्यावे असे म्हणत ओवेसींनी हैदराबादमधल्या मतदारांना साद घातली आहे.

सध्या महापालिका निवडणुकीमुळे हैदराबादमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुक प्रचारासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण केले आहे. त्यावर ओवेसींनी खोचक शब्दांत टीका केली. भाजपने या निवडणुकीत इतक्या लोकांना बोलावले आहे की, आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे बाकी राहिले आहेत. ते जरी आले तरीही काही होणार नाही. कारण मोदींनी त्यांना हात देत अबकी बार ट्रम्प सरकार म्हटले होते. पण ट्रम्प खड्ड्यात पडले आहेत. यावेळी ओवेसीने भाजपच्या तिकीट वाटपावरही निशाणा साधला. आम्हाला जातीयवादी म्हणतात. पण आम्ही तर हिदूंनाही उमेदवाऱ्या दिल्या आहेत. भाजपने किती मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे, हे त्यांनी सांगावे. त्यांना केवळ शहराचे नाव बदलण्यात रस आहे. त्यामुळे आता भाग्यनगर विरुद्ध हैदराबाद असा संघर्ष आहे, असे ओवेसीने म्हटले आहे.

हैदराबादचे नाव भाग्यनगर का होऊ शकत नाही?
हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हैदराबाद दौऱ्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही येथील मल्काजगिरी येथे रोडशो करत जनतेला संबोधित केले. यावेळी योगी म्हणाले, आपल्या सर्वांना निश्चित करायचे आहे, की एका कुटुंबाला आणि मित्र मंडळाला लुटायचे स्वातंत्र्य द्यायचे, की हैदराबादला पुन्हा भाग्यनगर करून विकासाच्या शिखरावर घेऊन जायचे हे आपल्याला निश्चित करायचे आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही फैजाबादचे नाव अयोध्या केले, अलाहाबादचे नाव प्रयागराज केले. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले. मग हैदराबादचे नाव भाग्यनगर का होऊ शकत नाही.

You might also like