Girish Mahajan | गिरीश महाजनांच्या सभागृहात डुलक्या, शेलारांनी कोपरखळी मारताच देऊ लागले घोषणा, भन्नाट व्हिडिओ व्हायरल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेत (Vidhansabha) सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु आहे. या अधिवेशनात गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना डुलकी (Catnap) लागल्याचा प्रकार घडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्य सरकारवर (State Government) जोरदार टीका करत असताना हा प्रकार घडला. यावेळी गिरीश महाजन (Girish Mahajan) हे देवेंद्र फडणवीस यांच्या मागिल बाकावर बसले होते. तर त्यांच्या बाजूला आशिष शेलार (Ashish Shelar) बसले होते. फडणवीस भाषण करत असताना महाजन हे डुलक्या घेत असल्याचे पहायला मिळाले. हा प्रकार लाईव्ह टेलिकास्ट कॅमेऱ्यात (Live Telecast Camera) कैद झाला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral) होत असून सत्ताधाऱ्यांनी यावरुन टीका केली आहे.

 

सभागृहात देवेंद्र फडणवीस हे गांभीर्याने बीडमधील (Beed) कायदा व सुव्यवस्थेच्या (Law and Order) प्रश्नावर बोलत होते. यावेळी मागच्या बाकावर बसलले गिरीश महाजन (Girish Mahajan) डुलक्या घेत होते. दरम्यान हा प्रकार आशिष शेलार यांच्या लक्षात येताच त्यांनी महाजनांना कोपरखळी (Nudge) मारली. यानंतर महाजन खडबडून जागे झाले, आणि लगेच काहीच घडलं नाही अशा आवेशात घोषणा देऊ लागले. हा सर्व प्रकार सभागृहातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या घटनेच व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी सभागृहात चर्चा सुरु असताना महाजन फिरत फिरत सत्ताधारी पक्षाच्या (Ruling Party) बाकावर जाऊन बसले होते. त्यावर प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आक्षेप घेतला. महाजन सत्ताधारी पक्षात आले का ? असा मिश्किल सवाल त्यांनी यावेळी विचारला. यानंतर महाजन तातडीने विरोधी बाकावर जाऊन बसले.

‘लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन’ विरोधकांचा टोला
गिरीश महाजन यांचा डुलकी घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress spokesperson Sachin Sawant) यांनी या प्रसंगाची तुलना ‘जाने भी दो यारो’ (Jaane Bhi Do Yaaro) चित्रपटामधील महाभारताच्या (Mahabharat) सीनसोबत केली आहे. या चित्रपटात महाभारत सादर करताना भिमाची भूमिका साकारणारं पात्र स्टेजवर डुलकी लागल्याने झोपतं आणि त्यालाही शेजारी बसलेली व्यक्ती झोपेतून उठवते, असे दाखवण्यात आले आहे. या दोन्ही प्रसंगाची तुलना करताना सचिन सावंत यांनी ‘चित्रपट – भाजपा ची नौटंकी… लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन’ अशा कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला आहे.

 

Web Title :- Girish Mahajan | MLA girish mahajan catnap while live speech of devendra fadanvis at vidhansabha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा