पास करण्यासाठी ‘त्या’ विध्यार्थीनीकडे केली शरीरसुखाची मागणी

नाशिक :  पोलीसनामा ऑनलाईन

शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. पास करण्यासाठी विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोन प्राध्यापकांना पोलिसांनी अटक केली आहे. हा धक्कादाय प्रकार समोर आल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील पंचवटी कॉलेजमध्ये घडला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1fb38129-bbe6-11e8-b83d-539144b4c2b9′]

प्रवीण सूर्यवंशी आणि सचिन सोनवणे अशी या दोन प्राध्यापकांची नावं आहेत. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्राध्याप्रकांना मंगळवारी (दि. १८) उशीरा रात्री पोलिसांनी अटक केली आहे.

अकरावी पास झालेल्या विद्यार्थिनीने २०१६ मध्ये बारावीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. या महाविद्यालयातील प्राध्यापक संशयित प्रवीण दादाजी सूर्यवंशी (रा. निर्माण नक्षत्र, औरंगाबाद रोड) व सचिन निशिकांत सोनवणे (धात्रक फाटा, बलरामनगर) यांनी मुलांना काय बनायचे आहे असे कागदावर लिहून मागीतले. यावेळी विद्यार्थिनीने कागदावर लिहून दिले त्यावेळी या दोघांनी तिच्या हाताला स्पर्श केला़ तसेच पिडीत विद्यार्थिनी ही बारावीला वारंवार एका विषयात नापास होत होती. बारावीमध्ये ती तीनवेळा नापास झाली आहे. त्यामुळे पास करण्याच्या बदल्यात शरीरसुखाच्या मागणीचा प्रस्ताव दोन्ही प्राध्यापकांनी तिच्याकडे ठेवला होता. तसेच अनेकदा त्यांनी तिची छेडही काढली होती.

मंत्रालय मारहाण प्रकरण कर्मचारी-अधिकाऱ्यांना भोवलं

विद्यार्थिनीला दिलेल्या प्रस्तावबद्दल काल या प्राध्यापकांनी तिला पुन्हा विचारणा केली. १ जानेवारी २०१५ पासून ते १८ सप्टेंबर २०१८ असा सुमारे तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या त्रासास कंटाळलेल्या पिडीत विद्यार्थिनीने सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मात्र विद्यार्थिनीने केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं कॉलेजच्या प्राचार्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.