‘गलगंड’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, ‘या’ 3 पद्धतीने डॉक्टर करू शकतात उपचार

पोलिसनामा ऑनलाइन – थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढण्याला गलगंड म्हणतात. थायरॉईड एक फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते जी गळ्याच्या आत ठिक कॉलरबोनच्या वर असते. हा रोग वेदनारहित असतो. मात्र, यामध्ये थायरॉईड ग्रंथीचा आकार जास्त वाढला तर यामध्ये खोकला, गिळण्यास आणि श्वास घेण्यास अडचण होऊ शकते. हार्मोनच्या बिघाडामुळे हा रोग होतो.

गलगंडाची लक्षणे
1 गळ्याला सूज येणे
2 थायरॉईड ग्रंथी छोटी किंवा मोठी होणे
3 गिळण्यास अडचण होणे
4 श्वास घेण्यास अडचण होणे
5 घसा बसणे
6 खोकला होणे
7 हात डोक्याच्या वर नेल्यास गरगरल्यासारखे वाटणे

हे आहेत उपाचार
1 औषध
2 थायराइडेक्टॉमी ऑपरेशन
3 रेडिएअ‍ॅक्टिव आयोडीन : रूग्णाला हे आयोडिन डॉक्टर देतात आणि नंतर ते रक्ताद्वारे थायरॉईडपर्यंत पोहचते आणि असाधारण वाढलेल्या ऊतींना नष्ट करते.