सोनं खरेदीचा ‘प्लॅन’ असेल तर थोडं थांबा, 1 जानेवारीपासून बदलणार ‘हे’ नियम, सरकारनं दिली मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सोन्याचे दागिणे खरेदी करु इच्छित असाल तर घाई करा. कारण 1 जानेवारीपासून सोने खरेदी करण्याचा नियम बदलणार आहेत. मोठ्या कालावधीनंतर कंज्युमर अफेयर्स मंत्रालयाने सोने चांदीच्या दागिण्यावर हॉलमार्किंग अनिवार्य असण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. हॉलमार्किंगचे अनिवार्य असणे 1 जानेवारीपासून लागू होईल.

मंत्रालय लवकरच यासंबंधित नोटिफिकेशन जारी करु शकते. जे भाग दूर अंतरावर आहे त्यांना अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात येईल. सरकारच्या या निर्णयाचा सराफ बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. परंतू ग्राहकांना याचे फायदे तर नक्कीच होतील. सध्या फक्त 40 टक्के दागिण्यावर हॉलमार्किंग करण्यात येते. भारत सोन्याचा सर्वाधिक मोठा आयातदार देश आहे, जो मोठ्या प्रमाणात दागिणे उद्योगाच्या मागणीला पूर्ण करतो. भारत दरवर्षी 700 – 800 टन सोने आयात करतो.

अनिवार्य हॉलमार्किंगला हिरवा कंदील –
सरकार 14 कॅरेट, 16 कॅरेट, 20 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या दागिण्यांना हॉलमार्किंग अनिवार्य करेल. यासाठी 400 ते 500 नवे असेसिंग सेंटर सुरु करण्यात येईल. सध्या देशात 700 पेक्षा जास्त असेसिंग सेंटर आहेत. सरकारच्या मते अजूनही आणखी असेसिंग सेंटर आवश्यक आहे.

ग्रामीण सराफांवर कोणतीही कारवाई करणार नाही सरकार –
ग्रामीण क्षेत्रापर्यंत पोहचण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. या दरम्यान सरकार ग्रामीण सराफांवर कोणतीही कारवाई करणार नाही. सोन्याच्या दागिण्यावर हॉलमार्किंग पूर्णता अनिवार्य बनवण्यात आले आहे. या दरम्यान बीआयएस (BIS) ग्राहकांना अनिवार्य हॉलमार्किंग दागिणे घेण्यासाठी जागरुक करतील.

काय असते हॉलमार्किंग –
हॉलमार्किंगने दागिण्यासाठी किती सोन्याचा वापर करण्यात आला आहे, इतर धातूंचा वापर किती करण्यात आला आहे याचे अचूक रेकॉर्ड कळते. नव्या नियमानुसार आता सोन्याच्या दागिण्याची हॉलमार्किंग असणे अनिवार्य आहे. यासाठी सराफांना लायसेंस घ्यावे लागेल.

Visit : Policenama.com