Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या कशामुळं आली अन् नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात आज सोन्याच्या किमतीमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारामधील सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांनी घसरण झाली, तर चांदीच्या किमतीतही घट दिसून आली. एक किलो चांदीची किंमत (Silver Price Today) 532 रुपयांनी खाली आली आहे. यापूर्वी मंगळवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 50,610 रुपयांवर बंद झाले होते, तर चांदी 63,171 रुपये प्रतिकिलो होती.

सोन्याच्या नवीन किमती (Gold Price, 18 November 2020)
दिल्ली सराफा बाजारामध्ये बुधवारी सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांची घसरण झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 50,253 रुपये आहे. पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 50,610 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रतिऔंस 1,882 डॉलर झाली आहे.

चांदीच्या नवीन किमती (Silver Price, 18 November 2020)
चांदीबद्दल बघितले तर आज त्यातदेखील घट नोंदली गेली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये चांदीची किंमत 532 रुपये प्रतिकिलोने घसरली. चांदीची किंमत 62,639 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी बुधवारी प्रतिऔंस 24.57 डॉलरवर बंद झाली.

सोन्यामध्ये घट का नोंदवण्यात आली
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी मजबूत झाल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्याने भारतीय बाजारावरही परिणाम झाला आहे. याशिवाय कोविड 19 लस संदर्भात सकारात्मक घोषणांचादेखील सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे.