परदेशी बाजारात तेजी असूनही आज देशांतर्गत बाजारात स्वस्त होऊ शकतं सोनं, जाणून घ्या का ?

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अमेरिकेत आलेल्या चांगल्या आर्थिक आकडेवारीमुळे आज आंतराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. मात्र रुपयामध्ये आलेल्या मजबुतीमुळे स्थानिक वायदा बाजारामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये असलेली तेजी थांबली आहे. बुधवारी, एमसीएक्स-मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधील सोन्याचा वायदा 0.35 टक्क्यांनी घसरून 51,320 प्रति 10 ग्रॅमवर आले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो 900 ते 70,000 रुपयांवर आला आहे. गेल्या महिन्यात 7 ऑगस्टला सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांवर पोहचल्या होत्या.

यामुळे, भारतात सोने स्वस्त होऊ शकते, कारण आजच्या सत्रात जागतिक चलनात चढ-उतार झाल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये चढउतार होऊ शकतात. मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयच्या ताज्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास असे दिसते की, जगभरात जागतिक स्तरावर उत्पादन वाढत आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किंमती पुन्हा घसरतील. आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती खाली येण्याची शक्यता आहे. कारण रुपया सतत मजबूत होत आहे.

भारतातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक पीएमबीने दिला ग्राहकांना मोठा धक्का
कोटक सिक्युरिटीजच्या अहवालात असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दर प्रति औंस 1900 च्या पातळीवर आधार घेत तेजीत वाढ झाली आहे, जर कोणताही नवीन ट्रिगर दिसत नसेल तर पुढील किंमतीमध्ये दबाव दिसेल.

परदेशी बाजारात आज स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी वाढून 1,971.07 डॉलर प्रति औंसवर होता, तर अमेरिकन सोन्याचा वायदा 1,978.90 डॉलरवर स्थिर होते. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.3 टक्क्यांनी वाढून 28.25 डॉलर प्रति औंस झाली.