सोन्याच्या किंमतीनं तोडलं ‘रेकॉर्ड’, पहिल्यांदाच 44 हजारांवर ‘दर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस संपूर्ण देशात दहशत माजवत आहे. या दरम्यान, मौल्यवान धातूंच्या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शनिवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्यात 1175 रुपयांनी वाढ झाली. पहिल्यांदाच सोने 44 हजार रुपयांच्या पलीकडे प्रति दहा ग्रॅम 44020 रुपयांवर गेले. यावेळी चांदी 830 रुपयांनी वाढून 49850 रुपये प्रति किलो झाली आहे.

शुक्रवारी महाशिवरात्रीमुळे स्थानिक बाजारपेठ बंद होती. दरम्यान, मागील सत्रातही जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून आली असून आठवड्याच्या शेवटी त्यामध्ये वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या शेवटी सोन्याचे दर 10 डॉलर वधारून 1643.40 डॉलर प्रति औंस (28.3495 ग्रॅम) झाले. या काळात एप्रिलमधील अमेरिकन सोन्याचा वायदा 25.80 डॉलर वधारून ते 1642.40 डॉलर प्रति औंस झाले.

शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान कोरोना व्हायरस आणि कच्च्या तेलाची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार मौल्यवान धातूंकडे वळले आहेत, यामुळे गेल्या तीन सत्रांत मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. यामुळे, सोने प्रति औंस 1600 डॉलर्सपर्यंत पोहोचले असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी व्यवसाय बंद असल्याने चांदीची किंमत 0.01 टक्क्यांनी घसरून 18.48 डॉलर प्रति औंस झाली. मात्र, गुरुवारी यात तेजी दिसून आली होती.