Lockdown 3.0 च्या पहिल्याच दिवशी सोन्या किंमतीत झाला मोठा बदल, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशात आजपासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला असून पहिल्या दोन टप्यात सोन्या-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सोन्याचा हाजीर बाजार बंद आहे. पण वायदा कारभार सतत चालू असतो. व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. सोन्याचा भाव २१३ रुपयाच्या तेजीसह ४५,७४० रुपये प्रति १० वर पोहोचला आहे. तर चांदीची किंमत ०.४२ टक्के तेजीसह ४१,४१० रुपये प्रति किलोग्रॅमवर गेली आहे.

सोन्याचा भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्ये सोन्याच्या जूनमधील डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्टची किंमत २१३ रुपयांच्या किंवा ०.४७ टक्क्याच्या तेजीसह ४५,७४० रुपये प्रति १० ग्रॅम झाली, ज्यात १३,७६४ लॉटचा व्यापार झाला. ऑगस्टमध्ये डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्टची किंमत ३२८ रुपये किंवा ०.७२ टक्क्यांनी वाढून, ४६,०२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली, ज्यात ६,२२१ लॉटचा व्यापार झाला.

बाजारातील तज्ञांनी सांगितले की, हाजीर मागणीमुळे व्यापाऱ्यांच्या नव्या खरेदीमुळे सोन्याचा वायदा भाव वाढला आहे. तर दुसरीकडे जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव ०.७६ टक्क्यांच्या तेजीसह १,७१३.९० डॉलर प्रति औंस झाला आहे. देशातील २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४,५६० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,३०० रुपये आहे.

चांदीचा भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये चांदीचा मेमधील डिलीव्हरी भाव १७३ रुपये किंवा ०.४२ टक्क्यांनी वाढून ४१,४१० रुपये झाला, ज्यात ४६० लॉटसाठी व्यापार झाला. अशाच प्रकारे जुलैमध्ये चांदीचा भाव १०८ रुपयांनी किंवा ०.२६ टक्क्यांनी वाढून ४१,७०५ रुपये झाला, ज्यात ५,२९४ लॉटसाठी व्यापार झाला. आंतरराष्ट्रीय बाजार न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव ०.८२ टक्के तेजीसह १५.०६ डॉलर प्रति औंस झाला.