खुशखबर ! सोन्याच्या किंमती कमालीच्या उतरणार, जगातील ‘या’ सर्वात मोठया संस्थेनं विकलं १७२० किलो सोनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) SPDR ने मार्केटमध्ये १. ७२ टन सोने विकले असून यामुळे सोन्याच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे. या सोनविक्रीमुळे SPDR ची मार्केटमधील पकड सैल झाली असून त्यांच्याकडे आता ७९४.०८ टन सोने बाकी आहे. तंज्ञानी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन डॉलरच्या वाढलेल्या किमतीनंतर आता सोन्याच्या दरातील वाढ कमी होऊ शकते. मंगळवारी बाजारात सोन्याच्या किमतीत १० ग्रॅम मागे ६०० रुपयांची घट झाली. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत ५०० ते ७०० रुपयांची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुढे काय होणार
तंज्ञानी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन डॉलरच्या वाढलेल्या भावामुळे सोन्याच्या किमतींमध्ये देखील वाढ पाहायला मिळत होती.पुढील २ ते ३ दिवस हा दबाव पाहायला मिळू शकतो. मात्र त्यानंतर पुन्हा भाव खाली जाऊ शकतात. येणाऱ्या काळात सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरांवर घडणाऱ्या घटनेचे परिणाम सोन्याच्या भावावर देखील पडत असल्याने भाव कधीही वाढू शकतात. तसेच हे सोने विकून एसपीडीआर स्वतःचा नफा देखील कमावत आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

You might also like