खुशखबर ! 2 दिवसांच्या तेजीनंतर ‘सोन्या-चांदी’च्या दरात मोठी ‘घसरण’, जाणून घ्या आजचे ‘दर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी सोन्याच्या दरात मोठी तेजी आल्यानंतर मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. भारतीय रुपया आज मजबूत राहिल्याने सोन्याच्या किंमतीत 420 रुपयांनी घसरण झाली. तर चांदीच्या दरात 830 रुपयांनी घसरण झाली. सोमवारी इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. सोमवारी सोने 720 रुपयांनी महागले होते.

सोन्याचे दर –
मंगळवारी दिल्लीत सराफ बाजारात सोन्याचे दर 41,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. आज सोनं 420 रुपयांनी महागले. मागील दोन दिवसांपूर्वी सोन्याचा दरात जवळपास 1500 रुपयांनी वाढ झाली होती.

चांदीचे दर –
चांदीच्या दरात देखील आज घसरण पाहायला मिळाली. आज चांदी 48,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. आज चांदीच्या दरात 830 रुपयांची मोठी घसरण झाली.

का स्वस्त झालं सोनं चांदी –
HDFC सिक्‍यूरिटीजचे हेड (एडवाइजरी-पीसीजी) देवर्श वकील यांनी सांगितले की अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. यामुळे देशांतर्गत सोनं देखील स्वस्त झाले. परंतु येत्या काही दिवसात सोन्याच्या दरात तेजी आली आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये का वाढला तणाव –
अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढल्याने कमोडिटीच्या किंमतीत तेजी आली आहे. क्रूडचे दर देखील वाढले आहेत. तर सोनेच्या किंमतीत तेजी आली आहे. अमेरिकेने गुरुवारी इराणच्या राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी मारले गेले. सुलेमानी एअरपोर्टवर जाताना अमेरिकेकडून हा हवाई हल्ला करण्यात आला. यात पॉप्युलर मोबलाइजेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस मारल्या गेल्याचे देखील वृत्त आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/