खुशखबर ! सोनं-चांदी 657 रूपयांपर्यंत झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुपया मजबूत झाल्याने मंगळवारी सोन्या चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. मंगळवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत 162 रुपयांनी घट झाली तर चांदीच्या किंमतीत 657 रुपयांनी घसरण झाली. सोमवारी सोनं 133 रुपयांनी महागलं होतं.

सोन्याचे दर –
मंगळवारी सराफ बाजारात सोनं 41,294 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण होताना दिसली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,579 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 18 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

चांदीचे दर –
दिल्ली सराफ बाजारात चांदीचे दर 48,527 रुपयांवरुन 47,870 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. आज चांदी 657 रुपयांनी स्वस्त झाली.

सोन्या चांदीच्या दरात का झाली घसरण –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी मजबूत झाला. ते म्हणाले की वैश्विक गुंतवणूकदार चीनमधील कोरोनो व्हायरसचा गुंतवणूकदारांवर मोठा प्रभाव होत आहे.

एप्रिल – डिसेंबरच्या दरम्यान 7 टक्क्यांनी घटली सोन्याची आयात –
सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर महिन्यात 6.77 टक्क्यांनी घसरुन 23 अरब डॉलर झाली होती. सोन्याच्या आयातीचा परिणाम सीएडीवर झाला. वाणिज्य मिनिस्ट्रीच्या मते यात पूर्व आर्थिक वर्ष 2018 – 19 च्या या तिमाहीत सोन्याची आयात 28.37 अरब डॉलर होती. सोन्याची आयात कमी झाल्याने व्यापारात घट झाली.

जुलैपासून सोन्याच्या आयातीत घट –
सध्याच्या आर्थिक वर्षात जुलैमध्ये सोन्याच्या इम्पोर्टमध्ये घसरण आली. मागील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये यात वाढ झाली होती. तर डिसेंबरमध्ये यात टक्के घट झाली. भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातदार आहे. सराफ बाजाराची मागणी पूर्ण करण्यासाठी ही आयात होते.