‘या’ कारणामुळं सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह च्या व्याजदारात कोणतेही बदल न झाल्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात मागील 5 दिवसात मोठी घसरण झाली होती त्यानंतर आज सोन्याचे दर वाढले. दिल्लीत सराफ बाजारात सोने 71 रुपयांनी महागले. चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. यामुळे चांदी 359 रुपयांनी महागली. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेत व्याजदर न घटल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली, परंतू रुपयांच्या मजबूतीमुळे सोन्याच्या मोठ्या किंमत वाढीला रोखले.

सोन्याचे दर –
गुरुवारी दिल्लीत सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 71 रुपयांनी वाढल्या. त्यामुळे सोने 38,564 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहचले. तर 99.9 टक्के शुद्ध सोने दिल्ली सराफ बाजारात 73 रुपयांनी स्वस्त झाल्याने दर 38,486 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर मंगळवारी सराफ बाजारात सोने 38,460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

चांदीचे दर –
बुधवारी एक किलो ग्रॅम चांदीचे दर 44,625 वरून 44,984 रुपयांवर पोहचले. या दरम्यान चांदी 359 रुपयांनी महागली.

HDFC सिक्योरिटीचे सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, सर्वांचे लक्ष आता 15 डिसेंबरकडे लागले आहे. जर व्यापार करारवर सहमती मिळाली तर सोन्याच्या दरात घसरण होईल. परंतू करारावर एकमत झाले नाही तर सोन्याच्या किंमती वाढतील.

गोल्डमॅन सॅक्सनुसार सोन्याच्या किंमतीत पुढील वर्षी वाढ होण्याची शक्यता आहे. गोल्डमॅन सॅक्सने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 1600 डॉलर प्रति औंसवर पोहचतील अशी शक्यता वर्तवली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/