सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाई गुन्हे शाखेने २ कोटी रुपयांची ६़७३ किलोग्रॅम वजनाची सोन्याची ५७ बिस्किटे जप्त केली आहेत. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

[amazon_link asins=’B06XK16RKM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’252d0dd9-9154-11e8-b4e3-4f9a50c7860d’]

तस्करीची बिस्किटे विकण्यासाठी काही जण बोरीवली येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारमधून आलेल्या ५ जणांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता १०० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे आणि २१ लाख रुपये सापडले. मेहबूब शेख (वय ३९), साजिया शेख (वय ३७), जाफर खान (वय ४६), मोहम्मद शेख (वय ३०) आणि तब्बसूम खान (वय २७) या पाच जणांना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत ६.७३ किलो वजनाची सोन्याची ५५ बिस्किटे हॉटेलच्या रुममध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने हॉटेलवर छापा घातला. रुमची झडती घेऊन हा सर्व माल जप्त केला.

या तस्करीबाबत आरोपींनी सांगितले की, सोन्याच्या तस्करीसाठी मुंबईतील वेगवेगळ्या भागातील झोपडपट्टी राहणाऱ्या महिलांचा वापर केला जायचा. त्यांना दुबईला पाठवले जायचे. तिथे गेल्यावर पिशव्या आणि पट्ट्यामध्ये दडवून सोने पाठवले जायचे. महिला विमानतळावरच्या पार्किग भागात संबंधित व्यक्तीला भेटल्यानंतर त्यांच्याकडे हे सोने सुपूर्द केले जायचे. दुबईला जाण्या येण्याचा खर्च व त्याबद्दल त्यांना काही मोबदलाही दिला जायचा.

महसूल गुप्तचर संचलनालयाला याची माहिती दिली असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे असे पोलिसांनी सांगितले.