तुम्हालाही रताळं आवडत नाही ? जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे !

अनेक लोक असे आहेत जे रताळं आवडीनं खातात. काहींना रताळं उकडून खायला खूप आवडतं. परंतु काही लोक असेही आहेत ज्यांना हे अजिबात आवडत नाही. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर आज आपण त्याच्या फायद्यांबद्दल जाणून जाणून घेणार आहेत. जर तुम्हाला याचे फायदे माहित झाले तर तुम्हीही रताळं आवडीनं खाल.

रताळं खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) बारीक, कृश असलेल्या व्यक्तीनं रताळ्याचं सेवन केलं तर फायदा मिळेल.

2) उष्णतेमुळं शरीराचा दाह होत असेल तर रताळं उकडून खावं.

3) लघवी करण्यास अडथळा येत असेल तर रताळ खावं. फायदा मिळेल.

4) शरीरावर सुज येत असेल तर रताळ्याचं काप करून तुपावर परतून खावं.

5) वारंवार भूक लागत असल्यास रताळ खाल्लं तर लवकर भूक लागत नाही.

या तक्रारी असल्यास रताळं खाणं टाळावं

1) पोटात वारंवार गॅस होणं

2) मधुमेह असलेल्या व्यक्तीनं रताळं खाऊ नये. कारण यात नैसर्गिक साखरेचं प्रमाण असतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.