48 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याबाबत आगामी 2 दिवसांमध्ये निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना भविष्यात चांगला महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्र सरकार दिवाळी पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा अंदाज आहे. हे उपभोक्ता मूल्य सूचकांक म्हणजे CPI-IW च्या बेस इयर म्हणजे या वर्षात बदल केल्यामुळे शक्य होऊ शकेल.

नव्या बदलामुळे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. एका रिपोर्टनुसार येत्या 21 ऑक्टोबर रोजी सरकार CPI-IW च्या आधार वर्षात बदल करु शकते आणि सविस्तर माहिती जारी करु शकते. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने डीए देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आणि त्याची प्रक्रिया देखील सुरु होणार होती. मात्र मार्चमध्ये कोरोना महासाथीमुळे लागू केलेल्या लॉकडॉनमध्ये डीए देण्यावर बंधन लावले. हे नियंत्रण 2021 पर्यंत लावण्यात आले आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता दिला जातो तो 17 टक्के आहे. नुकतेच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी प्री-पेड भेटवस्तू घोषित केल्या होत्या. या शॉपिंग कार्डचा उपयोग कर्मचारी 31 मार्च 2021 पर्यंत करु शकतात.

21 ऑक्टोबरच्या निर्णयावर लक्ष

केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष्य आता 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निर्णयावर लागले आहे. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार या दिवशी नवीन CPI-IW सीपीआय-आयडब्ल्यू सूचकांक जारी करु शकतात. जर यामध्ये बदल केला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल. कारण वेतन आणि डीएचं आकलन या सीपीआय-आयडब्ल्यूवर आधारित आहे. जेव्हा याला आधार वर्षात परिवर्तीत केले गेले, तर सरळ महागाई भत्त्यावर प्रभाव पडेल. CPI-IW च्या आधार वर्ष बदलण्यासाठी खासगी क्षेत्रातील कामगारांच्या कमीत कमी वेतनातही वाढ होईल.