राशनकार्ड धारकांसाठी खुशखबर ! फसवणूक रोखण्यासाठी मोदी सरकारकडून मोठ्या बदलाचे संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आधार कार्ड आणि राशन कार्डमध्ये होणाऱ्या फसवणूक आणि घोटाळ्यांना रोखण्यासाठी बदल करण्याची तयारी केली आहे. खोटी नावे तपासण्यासाठी राशन कार्डला आधार नंबर जोडल्यानंतर सरकार एका सिस्टिमवर काम करत आहे, ज्यात राशन कार्ड जारी करण्यापूर्वी त्याला डी-डुप्लीकेशन करण्यात येईल. यानंतर हे जारी करण्यात येईल. या प्रणालीमध्ये सरकार राष्ट्रीय स्तरावर राशन कार्डची तपासणी करेल.

राष्ट्रीय स्तरावर तपासणी
खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागने सचिव रविकांत यांनी माहिती देत सांगितले की एकदा की या प्रणालीला लागू केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर सर्व राशन कार्डांची तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर राशन कार्ड जारी करण्यात येईल. सध्या अनेक क्षेत्रात या प्रकारची तपासणी करण्यात येते.

फसवणूकीवर येणार रोख
मोदी सरकारचा हा महत्वाचा निर्णय आहे, ज्यात देशातील वाढत्या फसवणूकीला आळा घालण्यात येईल. आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करण्याचे हे देखील एक कारण आहे. सरकारने सांगितले की त्यांनी खोट्या रेशन कार्डला रद्द करण्यासाठी आधार नंबरला लिंक केले आहे. देशात जवळपास 23,30 कोटी रेशन कार्ड धारक आहेत, ज्यात 85 टक्के लाभार्थींना आधार नंबरशी जोडण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like