Google नं ‘या’ प्रसिध्द अ‍ॅपला केलं बंद, जाणून घ्या डिटेल्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गुगल ने आपल्या Trusted Contacts अ‍ॅप ला बंद केले असून, ते प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोवरून हटवण्यात आलं आहे. १ डिसेंबर २०२० पासून त्याचा सपोर्ट बंद केला जाणार असल्याचं, कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून गुगल आपले प्रॉडक्ट्स आणि सर्वीसेजला चांगले करण्यासाठी पाऊले उचलत आहे.

२०१६ मध्ये लाँच करण्यात आले होते

ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अ‍ॅपला गुगलने २०१६ मध्ये लाँच केले होते. त्याद्वारे वापरकर्ता आपल्या फेवरिट कॉन्टॅक्टसोबत डिव्हाईस ऍक्टिव्हिटी स्टेट्स आणि लोकेशन शेअर करु शकत होते. सुरुवातीस कंपनी या सर्विससाठी केवळ अँड्रॉयड युजर्सला ऑफर करीत होती. त्यानंतर आयओएससाठी अ‍ॅपल स्टोरवर उपलब्ध केले होते.

ईमेल मार्फत दिली माहिती

गुगलने वापरकर्त्यांना ईमेल द्वारे ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स बंद होत असल्याची माहिती दिली. त्यामध्ये म्हटले की, लोकेशन शेअर करण्यासाठी यापुढे गुगल मॅप्स सोबत जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता कॉन्टॅक्ट्सची गरज नाही. कंपनीने हे सुद्धा सांगितले आहे की, प्ले स्टोरवरन याला आता डाउनलोड करता येणार नाही. १ डिसेंबर २०२० पर्यंत वापरकर्ते त्याचा वापर करू शकतील. त्यानंतर ते आपोआप बंद होईल.