Gopichand Padalkar | छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ न मानणाऱ्यांची कदाचित…, अजित पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे स्वराज्यरक्षक (Swarajyarakshak) होते, त्यांना धर्मवीर म्हणू नका. त्यांना कोणत्याही एका धर्माशी जोडणे उचित ठरणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (winter Session) म्हटले होते. यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर (Dharmaveer) नाहीत असं म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असावी, अशी शेलकी टीका भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. हे प्रकरण शांत होत असताना गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) हा मुद्दा पुन्हा उकरुन काढला आहे.

 

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले आहे. संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असं जे कोणी म्हणतायत त्यांची कदाचित सुंता झाली असेल. ज्यांना असं वाटतंय, त्यांची परिस्थिती आता जाऊन तपासली पाहिजे, असे पडळकर म्हणाले. पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.

दरम्यान, अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वीही एकमेकांवर अनेकदा टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी बारामतीमधून पवारांचं घराणं उखडून फेकणार, असं वक्तव्य केलं होतं.
त्यावर अजित पवार चांगलेच संतापले होते. तुम्ही ज्या माणसाबद्दल मला प्रश्न विचराताय तो फार मोठा नेता नाही.
त्याने बोलावं आणि मी उत्तर द्यावं, असं होणार नाही. कोण कुठला उपटसुंभ,
त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाटवलंय, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

 

Web Title :- Gopichand Padalkar | bjp leader gopichand padalkar controversial statement about ajit pawar in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश