Gopichand Padalkar | ‘काका-पुतण्याच्या’ टोळीनं ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली’ – गोपीचंद पडळकर (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Gopichand Padalkar | भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आणखी एकदा राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले आहे. जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीबाबत सुप्रिम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलं आहे की,
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमीनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली 113 एकर जमीन मोकळी केली.
आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. असं पडळकर यांनी ट्वीटच्या माध्यमातुन माहिती दिली आहे.

पडळकर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांच्या वारंवार करत असणा-या टीकेच्या रोख हा पवार कुटुंबीयांकडे आहे.
त्यामुळे, यावेळी देखील त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यापुर्वी जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुनही त्यांनी मोठा वाद घातला होता.
त्यानंतर, आता जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमीनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या (Supreme Court) निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार (Sharad Pawar) कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसते.

 

Web Title : Gopichand Padalkar | vacates 113 acres land jejuri devasthan occupied mulshipattern style gopichand padalakar sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Update | सोन्यात मोठी घसरण, जाणून घ्या आता किती रूपयांना मिळतंय 1 तोळा सोने

तुमचा मोबाइल नंबर बदलला आहे का? तात्काळ Aadhaar Card सोबत करा लिंक, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

PM Modi | पीएम मोदींनी सांगितलं आपल्या बालपणीचे अलीगढ ‘कनेक्शन’, म्हणाले – ‘वडिलांकडे पैसे ठेवत होता अलीगढचा मुस्लिम व्यापारी’