PM Modi | पीएम मोदींनी सांगितलं आपल्या बालपणीचे अलीगढ ‘कनेक्शन’, म्हणाले – ‘वडिलांकडे पैसे ठेवत होता अलीगढचा मुस्लिम व्यापारी’

अलीगढ : PM Modi | अलीगढ (aligarh) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठ (Raja Mahendra Pratap Singh University) आणि डिफेन्स कॉरिडोर (Defense Corridor) चे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचा संबंध यूपी विधानसभा निवडणुकीशी  (UP 2022 assembly election) जोडला जात आहे. या दौर्‍यात नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना आपल्या बालपणीचा एक किस्सा लोकांना ऐकावला.

पीएम मोदी यांनी सांगितले की, जेव्हा ते लहान होते त्यावेळी एक मुस्लिम व्यक्ती होती, जी दरवर्षी तीन महिन्यासाठी गावी जात असे. ती व्यक्ती आमच्या भागात टाळे विकण्यासाठी येत असे. माझ्या वडीलांशी त्यांची चांगली मैत्री होती. त्यांना दिवसभर जे पैसे मिळत असत, ते वडिलांकडे देत असत. यानंतर जेव्हा ते गावी निघत असत तेव्हा सर्व पैसे घेऊन जात असत.

Pune Crime | मराठे ज्वलर्स फसवणूक प्रकरण : मंजिरी मराठेसह कौस्तुभ मराठेंना अटक

पीएम मोदी म्हणाले, आमचा लहानपणापासूनच यूपीच्या दोन शहरांशी संबंध होता. डोळ्यांचा काही आजार असेल तर सीतापुरला जाण्याबाबत बोलले जायचे. तर त्या मुस्लिम व्यक्तीकडून अलीगढ नाव ऐकले होते. पण आता टाळ्याशिवाय आपण शस्त्रांसाठी सुद्धा हे शहर ओळखतो.

पीएम मोदी यांनी उत्तर प्रदेशचे माजी सीएम कल्याण सिंह यांचीही आठवण काढली.
ते म्हणाले, आज मला कल्याण सिंह यांची गैरहजेरी जाणवत आहे.
मोदी पुढे म्हणाले, स्वतंत्र्य सैनिक श्याजी कृष्ण वर्मा यांनी एएमयूचे स्वप्न साकार करण्यासाठी आपली जमीन दान दिली होती.
हे स्वप्न साकार करण्यासाठी योगीजी आणि त्यांच्या टीमला धन्यवाद.

हे देखील वाचा

Maharashtra Police | पुणे, नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ ! कम्युनिटी पोलिसिंगवर भर, माहिती तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घालणार्‍या गडचिरोलीला ‘दुहेरी’ यश, औरंगाबाद, रायगडही ‘अव्वल’स्थानी

Pune Corporation | सर्वच वाहनतळ एकाच ठेकेदाराला देण्याच्या निविदेला 4 वेळा मुदतवाढ देऊनही ‘प्रतिसाद’ नाही; ‘झोन’निहाय ‘ग्रुप’ करून स्वतंत्र निविदा काढण्याच्या प्रशासनाच्या हालचाली

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : PM Modi | pm modi said that in childhood aligarh muslim businessman used to keep his money with my father

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update