Coronavirus : ‘या’ राज्याने लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढवला

पणजी : वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. गोवा सरकारने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 31 मे पर्यंत संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गोवा सरकारने 7 जून पर्यंत राज्यात संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

सर्चचा sex education कार्यक्रम आता YouTube वर देखील उपलब्ध, संचालिका डॉ. राणी बंग करणार मार्गदर्शन

WhatsApp वर तीन रेड टिकचा काय आहे अर्थ? सरकार तुमच्यावर ठेवणार का लक्ष?, जाणून घ्या

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करुन माहिती देताना म्हटले की, गोवा सरकारने 7 जून 2021 सकाळी 7 पर्यंत संचारबंदी Curfew वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी गोवा सरकारने राज्यात संचारबंदी वाढवली आहे.

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

गोव्यात सध्या संचारबंदी Curfew आहे. सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली आहेत. उद्योग धंदे सुरु आहेत. साप्ताहिक बाजार आणि मासळी चे बाजार बंद आहेत. सिनेमागृहे, जलतरण तलाव, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम सध्या बंद आहेत.

READ ALSO THIS

ACB Trap : लाच म्हणून घेतली ‘दारु-मटणा’ची पार्टी; ताव मारत असतानाच अधिकार्‍यांना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं, पुढं झालं असं काही…

Maratha Reservation : ‘…पण संभाजीराजेंना खरी भेट पंतप्रधान मोदींनी द्यायला हवी’

OBC Reservation : ठाकरे सरकारला मोठा झटका ! स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त OBC आरक्षण रद्द, SC नं याचिका फेटाळली