Governor Bhagat Singh Koshyari | अवघ्या अर्ध्या तासात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी आटोपला चिपळूण दौरा; परत मुंबईला रवाना

चिपळूण : पोलीसनामा ऑनलाइन – Governor Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अधिक मुसळधार पावसाने काही भागात दरडी कोसळली आहे. काहीं लोकांचा जीव देखील गेला आहे. तसेच कोकण भागातही अतिवृष्टीमुळे लोकांचे अधिक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रत्नागिरीतील (ratangiri) पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा केला. यांनतर आज (मंगळवारी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) रत्नागिरीतील (ratangiri) पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, काही अर्ध्या तासातसाच राज्यपाल कोश्यारीनी चिपळूण दौरा आटपून मुबंईला रवाना झाले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज (मंगळवारी) सकाळी तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राज्यपालांसोबत भाजपचे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) होते. त्यानंतर त्यांनी चिपळूण शहराची पाहणी केली आहे. या दरम्यान, त्यांच्यासोबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant), खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut), आणि आमदार शेखर निकम (MLA Shekhar Nikam) आदी उपस्थित होते. राज्यपालांनी चिपळूण शहरातील व्यापारी आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी देखील केली. चिपळूण शहराची अवघ्या अर्धातासात त्यांनी पाहणी करून राज्यपाल कोशारी आता परतीच्या मार्गावर रवाना होऊन आता मुंबईकडे निघाले आहेत.

या दरम्यान, जोरदार पावसाने चिपळूण शहरावर ही दुर्दैवी संकट कोसळलं तशी तेथील नागरिकांवर वेळ आली आहे, दरम्यान प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत देण्याची कार्यवाही करावी, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी गुहागर येथील RGPPL गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकी दरम्यान सूचना दिल्या आहेत. त्यावेळी ते म्हणाले, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी असल्याचं ते म्हणाले.

तसेच, राज्यपालांनी प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदतकार्य याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील (Collector Dr. B.N.Patil) यांनी पूरपरिस्थिती आणि प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती राज्यपाल महोदयांना दिली.
यावरून सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली.
हे मदत कार्य असेच सुरू राहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकास शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी,
अशा सूचना देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी दिल्या आहेत.

Web Titel :- Governor Bhagat Singh Koshyari | in just half an hour the governor left for chiplun tour go to mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tokyo Olympic 2020 | ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याच्या आनंदात महिला अ‍ॅथलीटच्या तोंडातून निघाली ‘शिवी’, पाहा व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाली ती

Rain in Maharashtra | आगामी 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 189 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी