शिवसेनेची वेळ वाढवुन देण्याची विनंती राज्यपालांनी नाकारली, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करतेय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होते. अवघ्या एक दिवसाचा शिवसेनेला वेळ मिळाला. शिवसेनेच्या सर्व आमदारांचं पत्र आम्ही राज्यपालांना दाखवलं. मात्र, राज्यपालांनी वाढीव वेळेला नकार दिला आहे पण आमच्या सत्तास्थापनेच्या दावा खारिज केलेला नाही. आमचा क्लेम कायम असून आम्ही पुन्हा सर्व प्रक्रिया पुर्ण करून पुन्हा राजभवनात येणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज असून स्थिर सरकार देण्याची आमची प्राथमिक आहे. आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपालांना सांगितलं आहे. आतमध्ये जे काही झालं ते सर्वकाही मी शेअर करू शकणार नाही असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. वेळ वाढवून देण्याची विनंती शिवसेनेनं केली होती मात्र राज्यपालांनी त्यांना वेळ वाढवुन दिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आता काय भुमिका घेणार यावर सर्वकाही अवलंबुन आहे. महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करत आहे काय अशीच चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

दिलेल्या मुदतीमध्ये शिवसेना सरकार स्थापन करू शकलेली नाही. त्यामुळे पुढं काय होतंय हे पहावं लागणार आहे. काँग्रेस आघाडीचा मुदतीत पाठिंबा मिळवण्यास शिवसेना अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता शिवसेनेची कोंडी झाली आहे. दरम्यान, आम्हाला वेळ वाढवुन देण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे पण आमचा सत्ता स्थापनेचा दावा नाकारलेला नाही असेही आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसई, परब आणि इतर मोठे नेते आदित्य ठाकरेंसोबत उपस्थित होते.

Visit : Policenama.com