CM योगी यांच्यानंतर ठाकरे सरकारचा निर्णय ! कोटामध्ये अडकलेल्या 2000  विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणार

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने विविध राज्ये आपआपल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी पृाधान्य देत आहेत. भाजपचे उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली.

महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या दोन हजार  विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे. राज्यात माघारी परतल्यानंतर त्या सर्वांना 14 दिवसांसाठी क्वांरटाइन करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

केंद्र आणि राज्यस्थान सराकरने परवानगी दिल्यानंतर दोन ते तीन दिवासांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योजना आखली जात आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे दीड ते दोन  हजार विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परिवारने त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तीन मे पर्यंत राज्य सरकार त्या विद्यार्थांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडूम कोटामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन्ही राज्यांनी केलेल्या उपाय योजना आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली.