पत्रकार विक्रम जोशी हत्या प्रकरणात पोलिस अधिकारी निलंबीत

गाझियाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –  गाझियाबादमध्ये झालेल्या पत्रकार विक्रम जोशी यांच्या हत्या प्रकरणात सीएम योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी विजय नगर पोलीस ठाणे प्रमुखांना निलंबित केले. या प्रकरणात सीओंकडे प्रथम विक्रम जोशी हत्याकांडाचा तपास सोपवण्यात आला होता, त्यांनी केलेल्या तपासात आढळले की, प्रकरणात विजयनगर पोलीस ठाणे प्रभारी यांच्याकडून 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत (जेव्हा हत्या झाली होती) योग्य देखरेखीचा अभाव झाला होता. योग्यवेळी योग्य कारवाई केली नसल्याचे आढळले.

यासोबतच एसएसपी यांनी प्रकरणाचा तपास विजयनगर पोलीसांकडून काढून घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात स्थानांतरित केला. विजयनगरच्या इन्स्पेक्टरला निलंबित केल्यानंतर एसएसपी कलानिधी नैथानी यांनी पोलीस ठाणे प्रमुखांमध्ये फेरबदलसुद्धा केले. यामध्ये प्रभारी देवेंद्र बिष्ट यांना विजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी बनवण्यात आले आहे, तर गैर जनपदकडून आलेले इन्स्पेक्टर कृष्ण गोपाल शर्मा यांना सिहानी पोलीस ठाणे प्रमुख बनवण्यात आले. सिहानी गेटचे इन्स्पेक्टर दिलीप बिष्ट यांना लाईन्स हजर करण्यात आले आहे.

दिलीप बिष्ट यांच्या दिड महिन्याच्या कार्यकाळात गुन्हे नियंत्रणात कमतरेमुळे वॅगनआर लूट, विविध लूटमार आणि अपहरण यासारखी प्रकरणे घडली, ज्या कारणामुळे त्यांना लाईन हजर करण्यात आले आहे. दिलीप बिष्ट यांच्याच सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापार्‍याचे अपहरण झाले होते, जो अजूनही सापडलेला नाही, यासाठी त्यांना सुद्धा लाईन हजर केले आहे.

3 चौकीचे इन्चार्ज लाईन हजर

अनेक दुकानांमध्ये चोर्‍या झाल्याने शास्त्री नगर चौकी इन्चार्ज यांना लाईन हजर करण्यात आले. तर नुकत्याच चिरोडीमध्ये झालेल्या गुन्हेगारी घटनेमुळे चिरोडी पोलीस चौकी इन्चार्जवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. मोरटा क्षेत्रात मागील सहा महिन्यात झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये चौकी इन्चार्ज मोरटा यांनाही लाईन हजर केले आहे. पत्रकार विक्रम जोशी यांना मागच्या सोमवारी 20 जुलैरोजी गुंडांनी मारहाणीनंतर गोळी मारली होती. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.