PAK : लग्नात AK-47 गिफ्ट देणे मोठी गोष्ट नाही; लोकांना रॉकेट, अ‍ॅन्टी-एअरक्राफ्ट गनदेखील ठेवण्याचा हक्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सामान्यत: लोक लग्नात वधू-वरांना अशी भेटवस्तू देतात जेणेकरून त्यांना ते आवडेल आणि ते त्यांच्या कायम लक्षात राहिल, परंतु पाकिस्तान (Pakistan)मधील एका महिलेने विवाहित जोडप्याला AK-47 भेट म्हणून दिली. ज्यामुळे सोशल मीडियावर नवीन चर्चेला उधाण आले. भारतात शस्त्रे ठेवणे ही एक मोठी गोष्ट मानली जाते, परंतु पाकिस्तान (Pakistan)मध्ये ही सामान्य गोष्ट आहे.

पाकिस्तानमध्ये एका महिलेने वराला त्याच्या लग्नात भेट म्हणून AK-47 रायफल दिली, ज्यामुळे तो खूप आनंदी झाला. हे पाहून सोशल मीडियावर लोक हैराण झाले, पण जेव्हा तुम्हाला तिथला कायदा कळेल तर तेव्हा तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. भारतात अगदी लहान परवानाधारक शस्त्रास्त्रे घेतानाही कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते, तर पाकिस्तानमध्ये शस्त्रे घेणे ही मोठी गोष्ट नाही. तेथील बहुतेक लोक आपल्याजवळ शस्त्रे ठेवतात. त्यांना हा अधिकार पाकिस्तानच्या बंदुकांशी संबंधित कायद्यांमुळे मिळाला आहे.

रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड्स, शॉर्ट, मध्यम आणि लांब रॉकेट्स, अ‍ॅन्टी-एअरक्राफ्ट बंदुका, मोर्टार इत्यादी जड शस्त्राच्या मालकीची परवानगी केवळ खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या आदिवासी भागात आहे. दुसरीकडे, पंजाब आणि सिंध प्रांतातील लोक शस्त्राचा परिणाम आणि वापर घटनात्मक हक्क म्हणून मानतात, तर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील लोक त्यास आपल्या संस्कृतीचा एक भाग मानतात.

पाकिस्तानच्या पेशावर भागात दारा आदम खेळ शहराला त्या ठिकाणाचा ‘गन व्हॅली’ मानले जाते. या छोट्या शहराची अंदाजे लोकसंख्या 80,000 आहे. परंतु, येथे सुमारे 2,000 शस्त्रे आहेत. येथे अर्ध्याहून अधिक लोक शस्त्रे बनविण्याचे काम करतात. बर्‍याच जणांसाठी बंदुका बनविणे म्हणजे खेळणी बनवण्यासारखे आहे.

You might also like